माय महाराष्ट्र न्यूज:आज भिवसेनखोरी बौद्ध विहार येथील पहिल्या केंद्राचे लोकार्पण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते.
येत्या काही महिन्यांत महापालिका निवडणूक येत आहे. काही लोक दारूची प्रतीक्षाच करीत असते. कुणीही दारूची अपेक्षा ठेऊ नका. निवडणुकीत दारू पाजण्याचा धंदा बंद करा, असा सल्ला केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांना दिला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी वंदे मातरम् जन आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत आहे. महापौर बदलला की काम बंद असे आरोग्य केंद्राचे होऊ नये, नाहीतर आपण बदनाम होऊ, असा इशारा देत गडकरी यांंनी आरोग्य केंद्र बंद पडल्यास
माझ्याकडे या, आपण पुन्हा सुरू करू, अशी ग्वाहीही दिली.यावेळी त्यांनी भिवसेनखोरी या परिसराची जुनी आठवण काढली. येथील तरुणांना खेळ, रोजगारात लक्ष देण्याचे आवाहन केले. शिक्षणासोबत आरोग्य सेवा महत्त्वाची आहे. याशिवाय मैदानेही
आवश्यक असून खेळातून उत्तम व्यक्तिमत्त्व तयार होईल. रोजगारासाठीही प्रयत्न केले जात असून संगणकाचा अभ्यासक्रम तसेच इंजिनिअरिंग केलेल्या तरुणांनी माझ्याकडे बायोडाटा पाठवावा.
सर्वच रस्त्यांची दुरावस्थाभिवसेनखोरी परिसरातील रस्ते दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा गडकरी यांनी केली. यावेळी त्यांनी सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा उपरोधिक टोलाही मनपाला हाणला. २५ लाखांत रस्ते दुरुस्त न झाल्यास आणखी ५० लाख देईल, असेही गडकरी यांंनी या परिसरातील नगरसेवकांना आश्वस्त केले.