Monday, July 4, 2022

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र, नुकसान होणार आहे. कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी आता केंद्र सरकार साठवणुकीतला कांदा बाहेर काढणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर हे कमी होणार आहेत.

शेतीमालाच्या दरात केंद्र सरकारचा हस्तक्षेप असल्यानेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याची टीका आता शेतकरी नेत्यांकडून सरकारवर होत आहे.देशभरात असलेल्या साठ्यातील कांदा विक्रीला काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

यामुळे कमीत-कमी 5 रुपयांनी कांद्याचे दर हे कमी होणार आहेत. एकीकडे पावसामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कांद्याच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण आता या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

13 ऑक्टोंबरला कांद्याला 43 रुपये किलोचा दर नाशिकच्या बाजारपेठेत मिळाला होता. यंदा पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे कांदा चाळीत साठलेल्या कांद्याला अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हा कांदा विक्रीसाठी काढला होता.

मात्र, गेल्या महिन्य़ाभरात पुन्हा कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. 4300 वर गेलेला कांदा आता 2000 रुपये क्विंटलवर येऊन ठेपलेला आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारने जर साठवणूकतला कांदा बाजारात आणला तर कवडीमोल दरानेच

विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येणार असल्याचे कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी सांगितले आहे.कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरात असलेल्या बाजारांमधील बफर स्टॉक कमी केला आहे. त्यामुळे 1.11 लाख टन कांदा आता बाजारात आला आहे. बाजारात कांद्याची

आवक वाढल्यानं किलोमागे 5 ते 12 रुपयांनी दर कमी होणार आहेत. केंद्राकडे असलेला स्टॉक मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, चंदिगढ, कोच्ची आणि रायपूर यासारख्या प्रमुख

बाजारपेठांमध्ये आणला गेला आहे. याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील स्थानिक बाजारांमध्येदेखील अधिकच्या कांद्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!