Sunday, June 4, 2023

KISS करताना डोळे का बंद होतात? हे आहे शास्त्रीय कारण?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:किस करताना डोळे का बंद होतात याचे शास्त्रीय कारण सांगणार आहोत. खरंतर किस हा तुमच्या जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि तो दोघांना जवळ आणतो.

किस घेताना डोळे बंद होण्याबाबत लंडन विद्यापीठाच्या रॉयल होलोवे यांनी एक अभ्यास केला होता, ज्यामध्ये असे समोर आले आहे की ‘स्पर्शाच्या संवेदने’मुळे असे घडते.

मानसशास्त्रज्ञ सँड्रा मर्फी आणि पॉली डाल्टन यांनी ‘स्पर्शाची भावना’बद्दल सांगितले आहे की जेव्हा जोडीदार एकमेकांच्या खूप जवळ येतात तेव्हा ते त्यांच्यामधील भावना जागृत करते.

अभ्यासानुसार, किस करताना जोडपे एकमेकांच्या इतके जवळ येतात की, ते त्यांच्या जोडीदाराच्या प्रेमात संपूर्ण बुडतात किंवा त्यांना प्रेमात बुडण्याच्या भावनेचा आनंद घ्यायचा असतो. यामुळे इकडे

तिकडे लक्ष जात नाही. ज्यामुळे त्या किसचा आनंद पूर्ण घेता येतो जर जोडप्यांनी डोळे बंद केले नाही, तर त्यांचं लक्ष आजूबाजूच्या गोष्टींमुळे भटकू शकतं किंवा मनात वेगळ्या भावना येऊ शकतात.

लंडन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असं देखील सांगितलं गेलं आहे की, लोकांना ‘स्पर्शाच्या संवेदना’बद्दल कमी माहिती आहे, पण जर आपण पाहिलं तर आपले डोळे किंवा ज्ञानेंद्रीय एकाच वेळी दोन

गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!