नेवासा
जेंव्हा जेंव्हा पृथ्वी तलावावर अधर्म वाढला तेव्हा तेव्हा परमात्मा भगवान श्रीकृष्ण जन्म घेवून आपल्या भक्तांचे रक्षण केले असे प्रतिपादन जंगले महाराज शास्त्री यांनी केले.
तालुक्यातील मुळाथडी पंचक्रोशीतील पानेगांव येथे सालाबादप्रमाणे ५७ वा अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याच्या किर्तन रुपी सेवेत भगवान महाराज शास्त्री बोलत होते.
त्यांनी यावेळी रामायण महाभारत प्रभू रामचंद्र जिवनातील अनेक दाखले देवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्याच बरोबर आजच्या जिवनशैली बाबत हि संस्कार, सर्व इंद्रियाचे नियमन सात्विकभाव ,व्यसनमुक्ती राजकारण यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. भावी पिढी यातुन बोध घेवून आपली प्रगती केली पाहिजे. पानेगांव सप्ताहाची नियोजनाची चर्चा तालुकाभर आहे. एवढं अप्रतिम नियोजन येथील ग्रामस्थांनी केले. कुठल्याही कार्यक्रमात राजकिय जोडे बाजूला ठेवले की असा सुंदर कार्यक्रम पार पडतो.त्याच बरोबर सर्व क्षेत्रातील जातीपंथातील लहान थोर सहभाग नोंदविल्याने कौतुकास्पद असल्याचे सांगून गौरवोद्गार जंगले महाराज शास्त्री यांनी काढले.
आठ दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन काकडा भजन सायंकाळी संत नामदेव महाराज चरित्र कथा त्यानंतर हरिपाठ संध्याकाळी ७ते९ किर्तन रुपी सेवा त्यानंतर दररोज नित्य क्रम प्रमाणे जवळपास दोन ते अडीच हजार भाविकांना जेवणाचं नियोजन केले.युवकांचे मोठा सक्रिय सहभाग होता.
अखंड हरिनाम सप्ताहात विविध सामाजिक राजकीय मंडळींनी भेटी देऊन नियोजनाचं कौतुक केले.
हरिनाम सप्ताहात रांगोळी, निबंध,संगित खुर्ची स्पर्धेचं आयोजन करण्यात आले यावेळी महाराजांचा हस्ते स्मृतिचिन्ह रोख बक्षिस देण्यात आले .
यावेळी सरपंच संजय जंगले, उपसरपंच रामराजे जंगले, देवराम महाराज, सोपान महाराज टेमक, भागवत टेकाळे, गणेश महाराज गायकवाड, गुडधे महाराज,शशिकांत पवार, परशुराम महाराज घावटे,कल्याण महाराज पुराणे, विष्णुपंत ठोसर, नामदेव कंक, शेषराव जगताप,कर्णासाहेब जाधव, शशिकांत शिंदे, चंद्रकांत जाधव, रामभाऊ वडितके, अमोल विटनोर,आदीनाथ विटनोर,अमित नवगिरे, डॉ. दशरथ जाधव, अण्णासाहेब माकोणे, हौशाबापू जंगले, डॉ जयवंत गुडधे, भाऊसाहेब काकडे, रमेश जंगले, द्वारकानाथ चिंधे, जालिंदर जंगले, लक्ष्मण जंगले, कैलास घुनावंत एकनाथ जंगले, नामदेव चिंधे, गजानन चिंधे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, किशोर नवगिरे, विशाल जंगले धोंडीराम कल्हापुरे, बाबासाहेब शेंडगे संजय पवार,संजय वाघमारे तुषार आंबेकर, गणेश आरंगळे संकेत गुडधे,नानासाहेब जंगले विजय जंगले आदीनाथ जंगले, सुभाष गुडधे,संदिप जंगले, दिपक जंगले, जनार्दन गागरे, बापूराव जंगले बबनराव जंगले,कडूबाळ काकडे, सुजित नवगिरे सुरज जंगले, अनिल जंगले,आदींसह मोठ्या प्रमाणावर महिलांसह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.