नेवासा
नेवासा तालुक्यातील नागरिकांनी काल शुक्रवार दि.२४ मार्च २०२३ रोजी सांयकाळी आकाशात चंद्र आणि शुक्राची अनोखी युती अनुभवली.
आपले नभोमंडळ विलक्षण आश्चर्यानी भरलेले आहे. असंच एक आश्चर्य २४ मार्च २०२३ रोजी आकाशात दिसून आले. ते आश्चर्य म्हणजे आकाशात झालेली चंद्र आणि शुक्राची अनोखी युती. शुक्रवारी सांयकाळी साडे सहा ते साडे सात वाजेच्या दरम्यान सूर्य मावळतीच्या पश्चिम दिशेला आकाशात कपाळावरील कुंकवाच्या चंद्रकोरी प्रमाणे चंद्र आणि त्यांच्या खालच्या बाजूला अगदी जवळच शुक्राची चांदनी असे विलोभनिय नजारा पहावयास मिळाला. या अद्भुत नजाऱ्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ही अनोखी खगोलीय घटना म्हणजे तृतीयेचा चंद्र आणि शुक्र ग्रह यांची युती होय. चंद्रकोरीच्या बरोबर खाली शुक्राची तेजस्वी चांदणी दिसत होती. छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रमाणे कपाळावर चंद्रकोर लावत असत, मराठमोळ्या स्त्रिया आपल्या सौभाग्याचे कुंकू म्हणून कपाळावर ज्या प्रमाणे चंद्रकोर लावतात,अगदी तशीच आजची चंद्रकोर आणि त्या खाली तेजस्वी शुक्राची चांदणी दिसत होती.अतिशय तेजस्वी दिसणारे चंद्र आणि शुक्र चांदनीची युती अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत .