Friday, December 3, 2021

नगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी पाेलिस तपासात खळबळजनक माहिती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्हा रुग्णालयातील काेविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीवेळी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांविषयी पाेलिस तपासात खळबळजनक माहिती पुढे आली आहे. अतिदक्षता विभागाला

जेव्हा आग लागली त्यावेळी तिथे सुरुवातीला काेणीही उपस्थित नव्हते, असे पाेलिस तपासात पुढे आले आहे, अशी माहिती पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दिली.

पाेलिस अधीक्षक पाटील यांच्या या माहितीमुळे आगप्रकरणाला पुढे गंभीर गुन्ह्याची स्वरूप प्राप्त हाेणार असल्याचे दिसते आहे. याचबराेबर निलंबित करण्यात आलेले जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पाेखरणा आणि वैद्यकीय अधिकारी सुरेश ढाकणे

यांच्याभाेवती अडचणी वाढल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास करणारे पाेलिस उपअधीक्षक संदीप मिटके यावेळी उपस्थित हाेते.अतिदक्षता विभागाला शनिवारी (ता. ६) सकाळी दहा वाजून ४७ मिनिटांनी आग लागली. ही आग पुढे वाढत गेली. सकाळी ११ वाजून १४ मिनिटापर्यंत

परिस्थिती हाताबाहेर गेली. या कालावधीत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका, असे काेणीही अतिदक्षता विभागात उपस्थित नव्हते, असे पाेलिस तपासात आढळले आहे. या काळात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकच अतिदक्षता विभागात हाेते.

आणि ते जीव वाचविण्यासाठी किंचाळत, ओरडत हाेते. काही रुग्णांनी स्वतः व्हेंटिलेटर आणि आयव्ही काढून बेडवरून रांगत, रांगत अतिदक्षता विभागाबाहेर पडले. एका मुलाने त्याच्या नातेवाइकांना खांद्यावर उचलून बाहेर काढले, असेही पाेलिस तपासात पुढे आले आहे.

गुन्ह्यात पाेलिस अनेक मुद्द्यांनुसार तपास करत आहेत. त्यात अटक केलेल्या चार जणांचा जबाब नाेंदविण्यात आले आहे. त्यात त्यांनी दिशाभूल करणारी, विसंगत अशी माहिती दिली आहे. एकप्रकारे पुराव्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे.

अतिदक्षता विभागात दाेन वैद्यकीय अधिकारी आणि तीन कर्मचारी कार्यरत हाेते.यापैकी तिथे काेणीही उपस्थित नव्हते. यापैकी दाेघांचे फाैजदारी प्रक्रिया संहिता १६४ नुसार जबाब नाेंदविण्यात आले आहेत. पाेलिसांकडे दाखल गुन्ह्याचा तपास आणि राज्य

 सरकारच्या समितीकडून हाेत असलेली चाैकशी या दाेन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत असे सांगून दाखल गुन्ह्याचा तपास हा अनेक तांत्रिक मुद्द्यांवर आणि काेणत्याही दबावाला बळी न पडता हाेणार असल्याचेही पाेलिस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!