Friday, December 3, 2021

महाराष्ट्रात या ठिकाणी कापसाला मिळाला विक्रमी भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाला फटका बसला होता. उत्पादन कमी झाल्याने यंदा कपाशीचे भाव वाढले आहेत. अकोला जिल्ह्यात गुरूवारी कपाशीला कमाल 8725 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे.

घटलेल्या उत्पादनामुळे जळगाव, यवतमाळ, अकोला, वर्धा, वाशिम इत्यादी जिल्ह्यांमध्ये कपाशीचे भाव वाढले आहेत. काल (गुरूवारी) अकोला जिल्ह्यात कपाशीला सर्वाधिक 8725 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

मुर्तिजापूर तालुक्यात कपाशीला 8600 रुपये प्रति क्विंटल भाव तर अकोट तालूक्यात 8600 ते 8725 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. बार्शीटाकली तालूक्यात कपाशीला 8200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला.

बोरगाव मंजूमध्ये 8500 प्रति क्विंटल भाव मिळाला. परंतु पातूर, बालापूरमध्ये कपाशीला कमी भाव मिळाल्याचे दिसून आले. पातूरमध्ये 5800 रुपये प्रति क्विंटल भाव तर बालापूरमध्ये 5400 ते 5700 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला.

जिह्यातील शेतकऱ्यांनी कपाशी विक्रीसाठी आणावी असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.कपाशीच्या यंदाच्या हंगामात पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले होते. अतिवृष्टीमुळे कपाशीच्या पिकाला फटका बसला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!