Tuesday, November 30, 2021

ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार :लस घेतलेली नसेल तर पेट्रोल-डिझेल, गॅस व रेशनचे धान्य मिळणं बंद होणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नसेल, तर आगामी काळात पेट्रोल-डिझेल, गॅस आणि रेशनचे धान्य मिळणं बंद होऊ शकतं. राज्य सरकारकडून राज्यात लवकरच औरंगाबाद पॅटर्न निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता असून, मंत्रिमंडळ

बैठकीत सर्वांनी यावर जोर दिल्यानं मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला हिरवा कंदिल दर्शवला असल्याची माहिती समोर आली आहे.इंडियन एक्स्प्रेसनं सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं. देशात सर्वात कमी लसीकरण झालेल्या जिल्हाधिकाऱ्यां सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

बैठक घेतली होती. यात औरंगाबादसह महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या पंतप्रधानांनी केलेल्या सूचनानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाला वेग देण्यासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले.

लस न घेणाऱ्या नागरिकांना पेट्रोल-डिझेल, रेशन आणि गॅस न देण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. लसीकरण वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा औरंगाबाद पॅटर्न राज्यात राबवला जाणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या

बैठकीत औरंगाबाद पॅटर्न राजभर राबवण्याची मागणी मंत्रिमंडळातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. पेट्रोल-डिझेल, रेशन आणि गॅसबरोबरच कार्यालयात प्रवेश न देण्याचा मुद्दा मंत्रिमंडळात उपस्थित करण्यात आला. त्याला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दर्शवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लसीकरणाला वेग देण्यासाठी औरंगाबाद पॅटर्न राज्यभर राबवण्याची मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. याविषयी बोलताना राज्याचे उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, ‘लसीकरण संथ

गतीने सुरू असल्याचं समोर आल्यानंतर लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही बंधक लागू केली आहेत. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळातील सदस्यांनी औरंगाबाद पॅटर्नची राज्यभर अमलबजावणी करण्याची मागणी केली’, असं देसाई यांनी सांगितलं.

‘नोव्हेंबर अखेरीपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ख्रिसमसपूर्वी जास्तीत जास्त लोकांना दुसरा डोस देण्याचा राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे. जेणेकरून नव्या वर्षात पदार्पण करताना राज्यातील

मोठ्या लोकसंख्येचं पूर्ण लसीकरण झालेलं असेल. ज्याचा फायदा हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी आणि विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी होईल’, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितलं .

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!