Wednesday, December 8, 2021

नगरमधील संतापजनक घटना:घरात घुसून 74 वर्षीय महिलेला मारहाण करून बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 74 वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नगर शहरातील तारकपूर परिसरातही घटना घडली आहे. तारकपूरमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेवर तिच्या घरात घुसून एक नराधमाने हे कृत्य केलंय. ही महिला पत्र्याच्या घरात राहत होती.

रात्री अंधाराचा फायदा घेऊन मध्यरात्री आरोपीने घरात घुसला. त्यानंतर त्याने महिलेला मारहाण  केली आणि तिच्यावर अत्याचार केला.  अत्याचार केल्यानंतर आरोप घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडितेचा जबाब नोंदवून तक्रार दाखल केली.

काते याने वृद्धेच्या तोंडावर बुक्क्याने व चापटीने मारहाण केली. ‘तु जर आरडाओरडा केला तर, तुझा या घरातच मुडदा पाडीण’, असे म्हणत काते याने वृद्धेवर अत्याचार केला. ‘तु जर कोणाला काही सांगितले तर, तुला याच घरात जाळून टाकील’, अशी धमकी दिली.

तसेच काते याने वृद्धेला काचेच्या बाटलीने डोक्यात मारहाण करून जखमी केले. जखमी वृद्धेला सकाळी स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तातडीने तपास

करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!