Wednesday, December 8, 2021

SBI चं कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दणका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल आणि तुम्ही कार्ड वापर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे 1 डिसेंबरपासून कार्ड संदर्भातील नियम बदलणार असून तुमच्या खिशाला आता चांगलीच कात्री लागणार आहे.

SBI बँकेनं आपल्या कार्डसाठीचे केलेले बदल जाहीर केले आहेत. तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. आधी ही बातमी वाचा. याचं कारण म्हणजे क्रेडिट कार्ड घेणं आता तुम्हाला महागात पडू शकतं.

SBI क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या EMI व्यवहारांसाठी अधिक पैसे द्यावे लागतील.SBI कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने याबाबत माहिती दिली आहे. SBI क्रेडिट कार्डमध्ये EMI व्यवहारासाठी आता 99 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

हा एक प्रकारचा करच असणार आहे. जो आपल्याला भरावा लागेल. 1 डिसेंबरपासून हा नवा नियम लागू होत आहे.
ई कॉमर्स किंवा शॉपिंग साइटवर म्हणजे  अमेझॉन किंवा फ्लिपकार्डवर बऱ्याचदा EMI शॉपिंग करण्यात येतं. एकदम खिशाला कात्री नको म्हणून EMI पर्याय

निवडला जातो. मात्र आता इथेही 99 रुपये ज्यादा मोजावे लागणार आहेत. 99 रुपये प्रोसेसिंग फी असणार आहे. 1 डिसेंबरपासून 99 रुपये क्रेडिटकार्ड असलेल्यांना भरावे लागणार आहेत. 1 डिसेंबरआधी ग्राहकांना मात्र EMI वर कोणतेही पैसे न

आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तुमचं ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं नाही किंवा प्रोसेस झालं नाही तर तुम्हाला 99 रुपये परत मिळू शकतात अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!