Friday, December 3, 2021

केवळ दारूचा वास आला म्हणजे व्यक्ती नशेत आहे असे नाही – हायकोर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केरळ उच्च न्यायालयाने एका सुनावणीवेळी निर्णय दिला की, खासगी जागेवर दारू पिणे तोपर्यंत गुन्हा ठरत नाही, जोपर्यंत दारू पिणारे काही उपद्रव करत नाहीत. एका याचिकाकर्त्या विरोधात सुरू असलेली कार्यवाही रद्द करत जस्टिस सोफी थॉमस यांनी म्हटले की, कुणालाही

त्रास न देता खासगी ठिकणा मद्यपान करणे गुन्हा ठरणार नाही. केवळ दारूच्या वासाचा अर्थ असा नाही काढला जाऊ शकत, की ती व्यक्ती नशेत होती किंवा दारूच्या प्रभावात होती.याचिकाकर्त्यावर केरळ पोलीस अधिनियमाच्या कलम ११८(अ) अंतर्गत खटला

दाखल करण्यात आला होता. त्याला एका आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलावलं गेलं होतं. जिथे तो कथितरित्या दारूच्या नशेत आढळला होता व त्यावर खटला दाखल करण्यात आला.याचिकाकर्त्याकडून बोलणाऱ्या वकिलांनी युक्तीवाद केला की,

याचिकाकर्ता ग्राम सहायक आहे आणि त्याला सायंकाळी ७ वाजता पोलीस स्टेशनला बोलावलं गेलं होतं. प्रकरण हे होतं की पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात केवळ यासाठी गुन्हा दाखल केला, कारण तो आरोपीची ओळख पटवण्यात अयशस्वी ठरला व आरोप केले की हा त्याच्याविरोधातील खोटा खटला होता.

या आधारावर त्याने चार्जशीट रद्द करण्याची मागणी केली.न्यायलयाने नमूद केले की, याचिकाकर्त्याने पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला किंवा तो गैरवर्तन केले, असा कोणताही पुरावा नाही. एफआयआरमध्ये एकच आरोप होता की तो दारूच्या नशेत होता आणि त्याचे स्वतःवर नियंत्रण नव्हते.

न्यायमूर्तींनी पुढे असे सांगितले की केरळ पोलीस कायद्याच्या कलम ११८(अ) नुसार दंडनीय गुन्हा सिद्ध करण्यासाठी, एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दंगलग्रस्त स्थितीत मद्यधुंद किंवा स्वत: ची काळजी घेण्यास असमर्थ असल्याचे आढळले पाहिजे.

या कायद्यांतर्गत ‘दारू’ या शब्दाची व्याख्या करण्यात आली नसल्याचेही निदर्शनास आले. या शब्दाचा अर्थ तपासण्यासाठी, न्यायालयाने अॅडव्हान्स लॉ लेक्सिकॉनवर विश्वास ठेवला. तसेच, न्यायालयाने ब्लॅकच्या लॉ डिक्शनरीचा देखील हवाला दिला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!