Sunday, June 4, 2023

नेवासा बाजार समितीच्या 18 जागांसाठी 117 उमेदवारी अर्ज दाखल

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

नेवासा

नगर जिल्ह्यामध्ये अग्रगण्य समजली जाणाऱ्या नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागांच्या निवडणुकीसाठी एकूण 117 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

नेवासा बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक सन 2023 ते 2028 करिता दि.27 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती आज सोमवार दि. 3 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, शेवटच्या तारखेअखेर 18 जागांसाठी एकूण 117 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
मतदार संघ निहाय दाखल झालेले अर्ज असे…

* सर्वसाधारण मतदार संघ(7 जागे साठी 44 अर्ज):--सावंत अरुण दादासाहेब, गंगावणे भगवान एकनाथ, पवार दिलीप शिवाजी,कार्ले उत्तम नामदेव,शेख राजु जानुभाई, विरकर सुनिल रावसाहेब,ताके अनिल दिनकरराव,
गायकवाड राजेंद्र पंढरिनाथ, काळे अमृत चंद्रचुड,लोखंडे शंकराव मुरलिधर, शेटे दत्तात्रय सुर्यभान,
जाधव किरण लक्ष्मण,साबळे शेषराव जगन्नाथ,फोफसे सारंग कोंडिराम,शेळके जनार्धन कचरु,
शेळके निलेश दादासाहेब,ढगे अशोक रामराव,पठारे हरिचंद्र नाथा,कावरे भानुदास विश्वानाथ,ढोकणे मिराबाई पांडुरंग, डिके बापुसाहेब रामराव, पुंड संजय गोरक्षनाथ, क्षिरसागर मुकेश कारभारी, नवले अर्जुन बाजीराव, करडक अशोक गंगाधर,पोतदार राजेंद्र रामकृष्ण, देशमुख अरुण बबनराव, जगताप देविदास बाबासाहेब, सावंत कानिफनाथ काशिनाथ,काळे अंकुश रंगनाथ,रोडे परसराम कचरु,पाटील नंदकुमार लक्ष्मणराव,शिंदे अरुण पांडुरंग, जाधव प्रकाश प्रभाकर,मोटे अर्जुन भाऊराव,तागड योगेश सखाराम, झगरे तुळशीराम हरीचंद्र, अंबाडे चंद्रकांत काशिनाथ,सावंत भाऊसाहेब तुकाराम,फुलारी संदिप कारभारी, शेळके रविकांत जालिंदर, येळवंडे नामदेव मधुकर, खाटिक दत्तात्रय रामचंद्र,गायकवाड गोरक्षनाथ चागदेव.

*भटक्या-विमुक्त जाती(1 जागे साठी 7 अर्ज):--परसैया राजधर मन्नु,सानप संगिता राजेंद्र,विरकर सुनिल रावसाहेब,
ढवाण सुंदराबाई सारंगधर,लोंढे सहदेव मुरलिधर,तागड योगेश सखाराम, बनसोडे पोपट अशोक

* इतर मागासवर्ग(1 जागेसाठी 11 अर्ज):–आखाडे बाबासाहेब रंगनाथ,सांळुके देविदस सदाशिव, नवले अर्जुन बाजीराव,नवथर नानासाहेब साहेबराव,शिंदे सविता संजय, पठारे हरिचंद्र नाथा, पोतदार राजेंद्र रामकृष्ण, दहातोंडे कैलास मुरलीधर, पाटील नंदकुमार लक्ष्मणराव, रोडे परसराम कचरू, जाधव जनार्दन रंगनाथ.

* महिला राखीव मतदारसंघ(2 जागेसाठी 14 अर्ज):— साळुंखे अनिता बाळासाहेब, काळे अश्विनी भरत, भोरे रजनी पुरुषोत्तम, सानप संगीता राजेंद्र, ढवाण सुंदराबाई सारंगधर, शिंदे सविता संजय, ढोकणे मीराबाई पांडुरंग, गुंजाळ हिराबाई भारत, पाडळे चंद्रकला ज्ञानदेव,रौंदळ स्वाती ज्ञानेश्वर, शेटे आशा वसंत, आगळे लीलावती भगवान जाधव मंगल जनार्दन.

*ग्रामपंचायत मतदार संघ(2 जागेसाठी 15 अर्ज):– माकोणे परसराम गोकुळदास, साळुंके देविदास सदाशिव, काळे विश्वास सोन्याबापु, साळुंके देविदास सदाशिव, पाडळे ज्ञानदेव कारभारी, ढगे अशोक रामराव, सावंत अरुण दादासाहेब, नवथर नानासाहेब साहेबराव, नवले अर्जुन बाजीराव, शेख राजू जानूभाई, दहातोंडे बाळासाहेब मच्छिंद्र,तुवर शिवाजी किसन, पाटील नंदकुमार लक्ष्मणराव, कोतकर बाबासाहेब भाऊसाहेब, कोकाटे ज्ञानदेव तुकाराम.

*अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ (1जागेसाठी 10 अर्ज):–खंडागळे सुमन रमेश, जाधव भास्कर गंगाधर, खंडागळे विकास सुनील, धायजे सुनील दिगंबर, खंडागळे ज्योती संतोष, पवार रामा रामाकिसन, वैरागर दादासाहेब शंकर, कानडे गोरक्षनाथ कडू, शेंडे नानासाहेब छबुराव, कांबळे पेत्रस ताराचंद.

*आर्थिक दृष्ट्या दुर्बल(1 जागेसाठी 6 अर्ज):— टेमक अशोक साहेबराव, भोरे गणेश पुरुषोत्तम, होन रावसाहेब अर्जुन, दहातोंडे बाळासाहेब मच्छिंद्र, शेळके जनार्दन कचरू,                दहातोंडे कैलास मुरलीधर.

* हमाल मापाडी मतदारसंघ (2 जागेसाठी 4 अर्ज):-– मोटे रमेश भाऊराव, माळवदे अशोक पुंजा डोईफोडे छगन सतु, मोटे रमेश भाऊराव.

* व्यापारी अडते मतदारसंघ (1 जागेसाठी 5 अर्ज):– काळे दत्तात्रय गोरक्षनाथ, सिददीकी गणी चौधरी, साळुंके बाबासाहेब सखाराम, मिसाळ संतोष तुकाराम,देशमुख दौलतराव चंद्रकुमार.

दाखल झालेल्या सर्व उमेदवारी अर्ज यांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी होणार असून दि. 6 ते 20 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ची मुदत आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून सुखदेव ठोंबरे काम पाहत आहेत.

 

 

 

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!