भेंडा: मनुष्याने जीवन जगत असताना भावा भावाचे प्रेम कसे असावे तसेच वडील मुलाचे नाते कसे सांभाळावे हे रामायण शिकवते असे प्रतिपादन नंदकिशोर महाराज नेवासेकर यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीराम कथेचे पाचवे पुष्प गुंफताना नंदकिशोर महाराज नेवासेकर बोलत होत .
कथेच्या पाचव्या पुष्पाला माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, चांगदेव महाराज काळे, कारभारी महाराज पंडित, शिवप्रसाद महाराज पंडित, अशोकराव मिसाळ, शांताराम राऊत, गणेश आंबेकर, डॉ नरवडे ,बबनराव धस संभाजी माळवदे आदी यावेळी उपस्थित होते.
नंदकिशोर महाराज नेवासेकर पुढे बोलताना म्हणाले की, परमार्थ व संसाराला उपयुक्त राम कथा आहे .जीवनात दुःख व सुखाचा औषध म्हणजे चिंतन आहे. वडील कित्येक दुःख पोहोचवतो, पण मुलगी सासरी जाताना चे दुःख पचवणं खूप अवघड जातं .वडिलावर सर्वात
जिवापाड प्रेम करते ती मुलगी. सुख दुःखांचे मिलन म्हणजे मानवी जीवन आहे. दुःख पचवण्याची ताकद राम कथा देते.जीवनात दु:ख आले तर रडायला नाही तर लढायला शिकलं पाहिजे. परमार्थ ज्यांना करायचा आहे त्यांनी कायम सावध राहिले पाहिजे .
भगवंताचे मर्म भक्ताला आणि भक्ताचे मर्म भगवंताला समजले पाहिजे.मनुष्याने जीवनात मार्गदर्शन संतांचे घ्यावे.संतांचे विचार जीवनात चुकू नका.निष्कपट जीवन जगावे. ज्या घरात नेहमी स्वच्छता असते तिथे भगवंत येत असतात .अंतकरण हे स्वच्छ असले पाहिजे .
परमार्थ मोकळ्या मनाने करावा. त्याचे नेहमी कल्याण होते. दु:ष्कर्म करू नये सत्कर्म करावे, भगवंताला दिलेली दान केले तर हे तुम्हाला नेहमी दुप्पट मिळेल .काही मिळाले नाही तरी आपण समाधानी असले पाहिजे . आई-वडील ,सद्गगुरु, बहीण यांना नेहमी आनंदी ठेवावे असे नंदकिशोर महाराज यांनी सांगितले.
कथेच्या पाचव्या पुष्पाला भाविक भेंडा, सौंदाळा ,कुकाना तसेच आजूबाजूच्या भाविक भक्तांनी कथा श्रवण करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.