Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यातील हा कारखाना शेतकर्‍यांनी बाहेरून उसाचे वजन करून आणल्यास तो स्वीकारणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यंदाच्या गळीत हंगामातील अडचणी सोडविण्यासाठी पुन्हा समन्वयाची बैठक बोलवावी, अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांच्याकडे केली.दरम्यान, कोपरगावच्या

शंकरराव काळे साखर कारखान्याने शेतकर्‍यांना 2 हजार 500 रुपयांप्रमाणे एफआरपी देणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रतिनिधी सोमनाथ बोरनाळे यांनी दिली. तसेच शेतकर्‍यांनी बाहेरून उसाचे वजन करून आणल्यास तो ऊस स्वीकारणार असल्याचे जाहीर करताच शेतकरी संघटनांनी टाळ्या

वाजवून काळे कारखान्याच्या निर्णयाचे स्वागत केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी यंदाच्या गाळप हंगामातील अडचणीवर चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील

सर्व शेतकरी संघटनांचे नेते आणि प्रतिनिधी यांची बैठक प्रादेशिक सहसंचालक (साखर) भालेराव यांनी बोलावली होती. या बैठकीला विशेष लेखा परीक्षक विलास सोनटक्के, राजेंद्र निकम आणि राजेंद्र देशमुख यांच्यासह कृषी अधिकारी क्रांती देेशमुख आणि परिवहन

अधिकारी उर्मिला पवार उपस्थित होते.ज्ञानेश्वरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शेवाळे यांची त्यांच्या कारखान्यांची माहिती दिली. अशोकचे एस. टी. देवकर, संजीवनीचे जी. बी. शिंदे, श्रीगोंद्याचे आर. एस. नाईक, कुकडीचे एस. बी. कुताळ,

वृध्देश्वरचे रविंद्र महाजन, अगस्तीचे एकनाथ शेळके, कोपरगावचे सोमनाथ बोरनाळे, प्रवरा आणि गणेशचे संजय आसावा आणि गंगामाई व संगमनेर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी एसआरपी, रिकव्हरी आणि गाळपाबाबतची माहिती दिली.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!