Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यातील घटना..प्रियसी च्या आत्महत्या नंतर प्रियकराची गळफास घेवून आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर काही तासातच तिच्या प्रियकराने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आज, बुधवारी दुपारी ही घटना घडली असून याप्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी एका १६ वर्षाच्या मुलीने दुपारी बारा ते एक च्या दरम्यान आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती याच गावात राहणाऱ्या तिच्या १७ वर्षाच्या प्रियकराला समजली.

आपल्या प्रेयसीने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी संबंधित प्रियकर मुलीच्या घरी गेला. त्यावेळी आपल्या प्रेयसीने आत्महत्या केली असल्याची त्याची खात्री झाली. यानंतर संबंधित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी

जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्याचवेळी या मुलीच्या प्रियकराने त्याच्या व्हॉट्सअपवर मी देखील माझे जीवन संपवत आहे, असे स्टेटस् ठेवले, आणि अवघ्या काही तासातच म्हणजे दुपारी तीनच्या दरम्यान मुलाने देखील शेतातील झाडाला

गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या बाबत दोघांनीही आत्महत्या का केली, याची माहिती अद्याप समोर आली नसून पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड,

सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडे यांच्यासह पोलिस कर्मचारी संभाजी शेंडे, शशी मस्के व संजय जायभाय यांनी भेट दिली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!