Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यातील प्रकार:गर्भपाताच्या गोळ्या खाणं पडलं महागात; तरुणीचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या खाल्लेल्या तरुणीचा एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध सदोष मनुष्यवध, अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गर्भपाताच्या गोळ्या खाणं पडलं महागात; तरुणीचा मृत्यूआरोपी सईद बेग याने मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. लग्नाची विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली.

तिचा गर्भपात करण्यासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या आणून तिला खाऊ घातल्या. त्यामुळे मुलीस पोटदुखी, उलटीचा त्रास सुरू झाला. अतिरिक्‍त स्त्रावाने तिची प्रकृती गंभीर झाली. तिला उपचारासाठी शहरातील एका खासगी

रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबद्दल आरोपी सईद बेग याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध, अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सईद ताहेर बेग (वय ३३, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध, अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. आरोपीला सईदला अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!