Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात १० काेटींचे नुकसान; ८४ कर्मचाऱ्यांचे निलंबन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सतरावा दिवस आहे. अजून त्यावर ताेडगा निघालेला नाही. संप लांबताे की, काय अशी परिस्थिती आहे. या संपामुळे एसटी महामंडळाचे राज्यपातळीवर दरराेज काेटी रुपयांचे नुकसान हाेत आहे.

एसटी महामंडळाच्या अहमदनगर कार्यालयाचे या संप काळात अंदाजे १० काेटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया अहमदनगर कार्यालयातील प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ८४ कर्मचाऱ्यांवर

निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.एसटी कर्मचाऱ्यांचा ८ नाेव्हेंबरपासून सुरू झालेल्या संपाला दिवसेंदिवस धार चढत आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावर संपकरी संघटना ठाम आहे. राज्य सरकार आणि सरकारने

नेमलेल्या समितीवर संपकरी संघटनांचा विश्वास नाही. न्यायालयाने आदेश देऊन देखील संप सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. त्यामुळे संपच्या निकालाचा काय परिणाम हाेताे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एसटी महामंडळाच्या अहमदनगर कार्यालयाचे या संपामुळे ५७५ बसेस गेल्या १७ दिवसांपासून उभ्या आहेत. सुमारे ३ हजार ९०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपातील ८४ कर्मचार्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. ही कारवाई

अधिक वेगाने करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.अहमदनगर जिल्ह्यात एसटीचे ११ आगार आणि दाेन कार्यशाळा आहेत. या संपामुळे अहमदनगर कार्यालयाचे दरराेजचे अंदाजे ५० लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न बुडत आहे.

गेल्या १७ दिवसांत अंदाजे १० काेटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. कार्तिक एकादशी काळातील उत्पन्नात वाढ हाेत असते. त्याकाळात अंदाजे उत्पन्न ६५ लाख रुपयांपर्यंत जाते. यावेळी त्यावर देखील पाणी साेडावे लागले आहे. हा संप असाच चालू राहिल्यास

एसटी महामंडळाचे राज्यपातळीवर दरराेज अंदाजे काेटी रुपयांचे नुकसान हाेत राहणार आहे. या संपामुळे खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे. त्यामुळे संपावर लवकरात लवकर ताेडगा काढावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून हाेत आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!