Friday, December 3, 2021

मोदींनी दाढी झटकली तर 50 लाख घरं पडतात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा दाढी झटकली तर त्यातून 50 लाख घरं पडतात, आणि दुसऱ्यांदा झटकली तर त्यातून 1 कोटी घर पडतात, असं वक्तव्य मध्य प्रदेशातील भाजप खासदार महोदयांनी केलं आहे. या खासदारांचं नाव आहेे.

जनार्दन मिश्र, ते मध्य प्रदेशातल्या रिवा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहे. जनार्दन मिश्र असेही अनेकदा चर्चेत असतात, पण आता त्यांनी केलेल्या या वक्तव्यमुळे सोशल मीडियावर ते धुमाकूळ घालत आहेत.मध्य प्रदेशातील एका स्थानिक सभेला जनार्दन मिश्र संबोधित करत होते.

त्यावेळी पंतप्रधान आवास योजनेबद्दल माहिती देताना त्यांनी त्याचा थेट संबंध मोदींच्या दाढीशी जोडून टाकला. ते म्हणाले की, ‘पीएम आवास योजना ही पंतप्रधान मोदींच्या दाढीतून बाहेर पडते, मोदींनी एकदा दाढी झटकली तर 50 लाख आणि दुसऱ्यांदा

झटकली तर 1 कोटी घरं बाहेर पडतात.’ हे ऐकल्यानंतर स्थानिकांमध्ये एकच हशा पिकला.एवढ्यावरच जनार्दन मिश्र थांबले नाहीत तर ते पुढं म्हणाले,’जोपर्यंत पंतप्रधान मोदींची दाढी राहिल, तोपर्यंत पीएम आवास योजनेचा लाभ मिळत राहिल.

त्यासाठी मोदींच्या दाढीला नेहमी पाहात राहा आणि घरं मिळवत राहा.’ हे वक्तव्य चर्चेत आल्यानंतर जनार्दन मिश्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लोकांना समजावण्यासाठी त्यांनी मोदींच्या दाढीचं उदाहरण दिलं. त्यांच्या

म्हणण्यानुसार, विरोधकांकडून पंतप्रधान आवास योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!