Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यात या ठिकाणी अकराशे बेडचे शरदचंद्रजी पवार कोव्हिड सेंटर सुरू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :लोकसहभागातून भाळवणी येथे सुरू होत असलेले शरदचंद्रजी पवार कोव्हिड सेंटर ही समाजाप्रती कौतुकाची बाब असून यामधून प्रशासनास मदत होत आहे. त्यामुळे येथील सेंटरला रेमेडीसिवर लस व ऑक्सिजनची

कमतरता भासू देणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले. यावेळी आमदार निलेश लंके हे संकटाच्या काळात समाजासाठी करीत असलेल्या कार्य हेनिश्चितच कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाळवणी येथे अकराशे बेडच्या कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या कोव्हिड सेंटरचे आज (बुधवारी ) लोकार्पण करण्यात येणार

आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सेंटरला भेट देऊन पाहणी केली. आमदार निलेश लंके, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यावेळी उपस्थित होते.

आमदार निलेश लंके यांनी या ठिकाणी सुरु असलेल्या कामांची तसेच पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देऊन या कोव्हिड सेंटरला लस व ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करा ,आम्ही प्रशासनावरील ताण कमी करू असे आमदार लंके म्हणाले.जिल्ह्यात लस व

ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे.परंतु येत्या दोन-तीन दिवसात लसीचा पुरवठा होणार असल्याने भाळवणीतील कोव्हिड सेंटरला पुरेसा पुरवठा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.भाळवणी अकराशे बेडच्या कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.

त्यातील शंभर बेड ऑक्सिजनचे असतील. प्रत्येक रुग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बॉटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी वापरण्यासाठी गरम पाणी सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा समावेश असेल.

मोठ्या स्क्रिनवर योगाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढेही दिले जाणार आहेत.

आ. निलेश लंके

 

विधानसभा सदस्य, पारनेर – नगर

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!