Saturday, January 22, 2022

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8 सदस्यांना अटक केली आहे. या टोळीचा प्रमुख मामून

हुसेन यावर 20,000 रुपयांचं बक्षीस घोषित केलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षात ही टोळी मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी तरुणींना अवैधपणे सीमा पार करून भारतातील विविध भागात पाठवत होते. पोलीस अधीक्षक आशुतोष बागरी

यांनी इंदूरमध्ये सांगितलं की, या टोळीचा प्रमुख बांग्लादेशी नागरिक मामून हुसैन (41) या नावाने झाली आहे.पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, मामून तब्बल 25 वर्षांपूर्वी भारतात आल्यानंतर विजय दत्त या नावाने खोटं रेशन कार्ड तयार केलं होतं.

रेशन कार्डाच्या आधारावर त्याने बनावटी आधार कार्ड, वोटर आयडी आणि पासपोटदेखील तयार केला होता. बागरींनी दिलेल्या माहितीनुसार, मामूनची बांग्लादेशात राहणारी पत्नी देखील त्याच्या टोळीत सामील झाली आणि ती एका संघटनेशी जोडल्याचा दावा करीत अनाथ,

निराधार आणि गरजू तरुणींना भारतात घरेलू कामासंबंधित रोजगार मिळवून देण्याचं कारण सांगून फसवत होती. त्यांनी सांगितलं की, गेल्या 10 वर्षात अशा हजारो बांग्लादेशी तरुणींना मामूनच्या टोळीने अवैधपणेन सीमा पार करीत भारतातील विविध

भागांमध्ये पाठवलं आणि त्यांना देह विक्री व्यापारात ढकललं.पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले की, मामूनने विविध शहरातील दलालांना आपल्या टोळीशी जोडलं होतं आणि देह व्यापारात ढकलेल्या बांग्लादेशी तरुणींना मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तमिलनाडू, कर्नाटक,

आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांमध्ये ग्राहकांकडे पाठवित होते. त्यांनी पुढे सांगितलं की, मामूनने भारतातदेखील एका महिलेशी लग्न केलं आहे आणि विजय दत्त या आपल्या खोट्या ओळखीतून सर्वांचीच फसवणूक करीत होता.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!