Wednesday, December 8, 2021

रेल्वे बोगीत बेड व्यवस्था करा आमदार राधाकृष्ण विखेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

.माय महाराष्ट्र न्यूज टिम :सरकारी, खाजगी रुग्णालयातील बेड्स कोरोना उपचारासाठी अपुरे पडत आहेत. रेल्वे बोगी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध केल्यास कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होतील. नगर जिल्ह्यात कोव्हीड रुग्णांची वाढत चाललेली संख्या आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध होत

नसलेल्या आरोग्य सुविधांसह बेडचे गांभिर्य लक्षात घेवून शिर्डी येथे विलगीकरण बोगीची उपलब्धता करुन देण्याची मागणी भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात आ.विखे पाटील यांनी गोयल यांना विलगीकरण बोगीची मागणी करणारे सविस्तर पत्र दिले असून, यामध्ये शिर्डीसह नगर जिल्ह्यात कोव्हीड संकटाची परिस्थिती बिकट बनली असून, शिर्डी संस्थानसह सर्व सरकारी रुग्णालये, खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची

व्यवस्था केली असली तरी, ती अपुरी पडत आहे.कोव्हीडचे संक्रमण दिवसागणीक वाढत चालल्याने उपलब्ध बेडची संख्याही आता रुग्णालयांमध्ये कमी पडू लागल्याचे वास्तव यापुर्वीच राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे आ.विखे पाटील पत्रात नमुद केले.

आपल्या विभागामार्फत देशपातळीवर रेल्वे बोगीच्या माध्यमातून विलगीकरण बेडची व्यवस्था करण्यात आली. असून कोव्हीड रुग्णांसाठी बेडची उपलब्धता करुन देण्याचा आपल्या संकल्पनेतील उपक्रम देशपातळीवर अतिशय

यशस्वी झाला आहे. याचा कोव्हीड संकटात रुग्णांना फायदाही झाला. विलीगीकरण बोगीची उपलब्धता शिर्डी आणि नगर जिल्ह्याकरीता झाल्यास त्याची मोठी मदत या कठीन परिस्थितीमध्ये होवू शकते याकडे मंत्री गोयल यांचे आ.विखे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

सद्य परिस्थितीत शिर्डी येथील श्री.साईबाबा मंदिर बंदच असल्याने भाविक येणेही पुर्णपणे थांबले आहे. त्यामुळे रेल्वे सुविधा ही बंद आहेत. आपण विलगीकरण बोगीची परवानगी दिल्यास शिर्डी रेल्वे स्थानकावर व्यवस्थाही चांगली होवू शकते ही बाब आ.विखे पाटील यांनी मंत्री पियुष गोयल यांच्या

निदर्शनास आणून देत नगर जिल्ह्याकरीता तातडीने विलगीकरण बोगी बेडची उपलब्धता करुन देण्यास सहकार्य करण्याची विनंती पत्राव्दारे केली आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!