Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यातील या तालुक्यातील हॉस्पिटल व मेडिकल वगळता सर्व बंदचा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी अनावश्यक गर्दी आढळून आल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता तालुक्यातील सर्व दुकाने व्यवस्थापन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सर्व नागरिकांनी याचा काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केली आहे.
मिशन ब्रेक द चेन यानुसार राज्यामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यामध्ये तशा सूचना दिल्या आहेत .

त्यानुसार पारनेर मध्ये तहसिलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या पथकाने पारनेर तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी भेटी दिल्या मात्र अनेक ठिकाणी अनावश्यक गर्दी आढळून आल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे यांनी पारनेर तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भाजीपाला व फळबाजार ठिकाणी गर्दी उसळलेली होती नागरिक जीवाची पर्वा न करता कोणतीही कारणे सांगून रस्त्यावर फिरत आहे दुधाची पिशवी अंडी औषधे आणायला चाललोय अशाप्रकारचे कारणे सांगून प्रशासनाची दिशाभूल करत आहे त्यामुळे आजचा दिवस अत्यावश्यक सेवा वगळता

सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परिस्थिती व प्रसंगानुरूप निर्णय प्रशासनाने घेतला आहे नागरिकांनी या निर्णयाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!