Saturday, January 22, 2022

31 डिसेंबर आधी ही कामे करुन घ्या अन्यथा होईल मोठे नुकसान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यंदाचं वर्ष संपायला काही दिवस उरले आहे. नवीन वर्षात प्रवेश करण्याआधी म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांना त्यांची काही कामे पूर्ण करावी लागतील, नाहीतर त्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

ईपीएफ खात्यात नोंदणी करण्यापासून आयटीआर फाइल भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला कोणते काम पूर्ण करायचे आहेत यावर एक नजर टाकूया.

सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली होती. नवीन आयकर पोर्टल आणि कोरोना व्हायरसमुळे आलेल्या अडचणींमुळे मोदी सरकारने मुदत वाढवली होती. आता

दंड टाळण्यासाठी करदात्यांना 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर भरावा लागेल.तुम्हीही पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. पेन्शनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे,

अन्यथा निवृत्ती वेतन मिळणे बंद होईल. वर्षातून एकदा, पेन्शनधारकांना त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजेच जीवन प्रमाणपत्र 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करावे लागते, परंतु यावेळी ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. जीवन प्रमाणपत्र सादर केल्यावर पेन्शनधारक जिवंत आहे की नाही हे उघड होत असते.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांचे KYC करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. डीमॅट, ट्रेडिंग खात्यात नाव, पत्ता, पॅन, वॅलिड मोबाइल नंबर, वय, KYC अंतर्गत योग्य ईमेल आयडी अपडेट करणे आवश्यक आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सदस्यांना UAN क्रमांक आधारशी जोडणे आवश्यक आहे. UAN ला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. EPFO गुंतवणूकदारांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य झाले आहे. असे न केल्यास येत्या काही दिवसांत त्रास होऊ शकतो आणि पीएफ खाते बंद होऊ शकते.

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत 1 जानेवारीपासून बदलणार, काय आहे RBI चे नवीन नियम?
31 डिसेंबरपर्यंत कमी व्याजावर गृहकर्ज मिळेल तुम्ही बँक ऑफ बडोदा चे ग्राहक असल्यास, तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत स्वस्त गृहकर्ज मिळवू शकता.

सणासुदीच्या हंगामात, BoB ने गृहकर्जाचा दर 6.50 टक्क्यांपर्यंत कमी केला होता, जो 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!