Saturday, January 22, 2022

म्हणून शिवाजी कर्डीलेंवर खोटे आरोप केले जात आहेत;स्वतः शेण खायचं अन्…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी महिलेवरील अत्याचार प्रकारणामुळे नगर तालुका महाविकास आघाडी व त्यांच्या नेत्यांची अब्रूची लक्तरे वेशीला टांगली आहेत.

तोंड दाखवायला जागा राहिली नाही. जिल्हयातच नव्हे तर राज्यात नाचक्की झाल्याने या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरु आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डीले

यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी आघाडीच्या नेत्यांनी मोकाटेंची व्हिडीओ क्लिप बारकाईन पहावी. यापुढे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मोकाटे यांच्यावर दाखल झालेल्या आत्याचार प्रकरणाबाबत नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माजी आमदार कर्डिले यांच्यावर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकार्यांनी प्रेस घेत माजी आमदार कर्डिले यांच्यावरील आरोप खोडून काढले.

कोणी काय केले, कसे व्यभिचार केले, काय कुटाने केले, कोणी शेण खाल्लं हे जेऊर गटातील लोकांना आणि नगर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांना समजले आहे. या प्रकरणातील आरोपी कोण आणि फिर्यादी कोण हे पोलीस रेकॉर्ड वर आहे.

त्यांचा आणि माजी आमदार कर्डीले यांचा कोठेही संबंध नाही. हे सर्व खोटं आहे असे महाआघाडीचे नेते सांगतात तर त्यांना फरार होण्याची गरज का पडली? स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या अंगावर चिखल उडवायचा अशी ही वस्तुस्थिती आहे.

नगर तालुक्याची संस्कृती खूप चांगली आहे. अनेक थोर संत कीर्तनकार यांचा वारसा आणि विचार नगर तालुक्यात रुजलेले आहे. पण त्या विचारांना तालुक्याच्या संस्कृती ला काळिमा फासणारे काही लोक आहेत.

झालेल्या घाणेरड्या प्रकरणाने जेऊर गटाची, नगर तालुक्याची बदनामी झाली. घटना झाल्यानंतर महाआघाडीला माजी मंत्री कर्डीले यांच्यावर आरोप करण्याची आठवण झाली. या प्रकरणामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोंड लपविण्याची वेळ आली आहे.

म्हणून त्यांच्यावरील लोकांचा संताप कमी होण्यासाठी कर्डीले यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. आरोप करताना त्यांनी काही पुरावें का दिले नाहीत ? चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. खोट बोल पण रेटून बोल हीच नीती महाआघाडी च्या लोकांनी कायम ठेवली आहे.

महाआघाडी ने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना अजून डोक्यावर घेऊन नाचा आमची हरकत नाही. घोड्यावर, हत्तीवर मिरवणूक काढा, पेढे वाटा आम्हाला त्याचे घेणे देने नाही. तुम्ही कोणत्या चालीचे आहेत, तुमची संस्कृती काय आहे. पांढऱ्या कपड्यांच्या मागे तुम्ही काय केले हे आता उघड झाले आहे.

पण माजी मंत्री कर्डीले यांच्यावर विनाकारण खोटे आरोप करू नयेत. तालुक्यातील जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी खोटे आरोप सुरू आहेत.आमच्या नेत्यावर खोटे आरोप सहन केले जाणार नाहीत. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल. येत्या

काळात महाआघाडीचे सर्व काळे कारनामे जनतेसमोर पुराव्यानिशी मांडण्यात येतील असेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!