Saturday, January 22, 2022

महाराष्ट्रात पुन्हा संकट: या कालावधी मुसळधार पाऊस ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी उन्हाळा, आणि हिवाळ्यातही पाऊस बरसला आहे. त्याशिवाय

वर्षभरात जवळपास दर महिन्याआड पाऊस पडलाय. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही राज्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. नुकतीच थंडी सुरू झाल्याने सर्वत्र तापमान खालावलं आहे.

मात्र पावसामुळे काही काळासाठी थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. याआधी अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यासाठी भरपाई देण्याची मागणी विरोधीपक्षांनी केली आहे.

सध्या काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस बरसणार आहे.

याशिवाय राज्यातील उत्तर भागातही पाऊस होणार आहे. जळगाव, धुळे या भागात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहिल. तर गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती,अकोला जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.

पश्चिम महाराष्ट्रत तुरळक पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. वारा (30-40 किमी ताशी) वेगाने पुढे सरकेल. तर 27 डिसेंबरला विर्दभात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!