Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यात या ठिकाणी प्रवेशासाठी आता मास्क सक्ती,अन्यथा ५०० रुपयांचा दंड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात करोनाचा प्रादूर्भाव संपण्याचे नाव घेण्यास तयार नाही. त्यातच आता ओमिक्रॉनने नगर जिल्ह्यात प्रवेश केला आहे.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या

कार्यालयात योग्य मास्कची सक्ती करण्यात आली आहे. विना मास्क येणाऱ्यांवर ५०० रुपये दंडाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या

मुख्यालय आणि तालुका पातळीवर असणाऱ्या पंचायत समितीच्या कार्यालयात विविध कामे आणि प्रश्न घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी असते. यातील अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांच्या निदर्शनास आले.

यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयासह जिल्हा परिषद मुख्यालय आणि पंचायत समितीच्या कार्यालयात विना मास्क असणाऱ्यांना बंदी केली असून आले तर त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यालयात आतापर्यंत १० कर्मचाऱ्यांना विना मास्कमुळे दंड करण्यात आला असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!