माय महाराष्ट्र न्यूज:ईडीचे अधिकारी माझ्याकडे येऊन गेले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी केले आहे.
मला वाटले माझी परिस्थिती पाहून अधिकारीच स्वत:च्या खिशातून पैसे काढून मला देतील व म्हणतील राहू दे खर्चायला लागतील असा किस्सा आमदार लंके यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत सांगितला. अहमदनगरला महाविकास आघाडीचा बाजार समितीच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.
भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर ज्यांना कुणी नड नाही त्यांना लंके नडतो असे म्हणत विखे पाटील यरांच्यावर निशाणा साधला आहे.नीलेश लंके
पुढे बोलताना म्हणाले की, आमची सत्ता गेल्यानंतर अधिकारी जरा वेड्यासारखे करायला लागले होते. मी म्हटले मला मागचा नीलेश लंके व्हायला लावू नका. आम्ही सुसंस्कृत राजकारणी आहोत. पण आमच्याकडे
जशास तसे उत्तर असते. आमची पाया पडायची, हात जोडायची तयारी आहे आणि वेळप्रसंगी बाह्या वर करायचीही तयारी आहे. तुम्ही एक पाऊल वाकडे टाकला, तर आम्ही दोन पावले वाकडी टाकणार, हेही तुम्हाला सांगतो. माझ्यामागे ईडी लावणे
सोपे नाही, संघर्ष माझ्या पाचवीला पुजलेला आहे. मी पुढेही संघर्ष करेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. तर गेली अडीच वर्षे आम्ही सत्तेत होतो. मात्र आम्ही सत्तेचा कधीच गैरवापर केला नाही. आम्ही जनतेची कामे केली असेही त्यांनी यावेळी सांगितले.