Tuesday, January 18, 2022

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा भाजप प्रदेशाध्यक्षांना मोलाचा सल्ला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रांताध्यक्ष आहेत, करोना संकटात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला त्याचं कौतुक देशात झालं आहे. आता ते आजारी आहेत. अशा वेळी त्यांच्यावर टिका

करु नये, हे संकेत सर्वांनी पाळले पाहिजे, असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.45 दिवसापासून राज्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही, मुख्यमंत्र्यांचा चार्ज कुणाकडे तरी द्या, हवं तर आदित्य ठाकरेंकडे द्या,

अशी टीका भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. याबाबत माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर ना. थोरात बोलत होते.विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये गुप्त मतदाना ऐवजी आवाजी मतदान पद्धत घेण्याचे कारण काय? या

प्रश्नावर ना. थोरात म्हणाले, अध्यक्षपदासाठी आम्ही काही विशेष निर्णय घेतले आहे. लोकशाहीमध्ये विशेषतः लोकसभेत ज्या पद्धतीने अध्यक्षपदाची निवड होते ती पद्धत आम्ही स्विकारली आहे. विधानपरिषदेच्या निवडीवेळी सुद्धा अशीच पद्धत आहे.

देशातील अनेक राज्यात ती पद्धत स्वीकारलेली आहे. त्यामध्ये गुप्त मतदान पद्धत नाही. सोमवारी ही निवडणूक जाहीर होईल. काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी ते म्हणाले, काँग्रेस पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!