माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं
पाहायला मिळालं. अशात पुन्हा एकदा राज्याला गारपीटीचा तडाका बसणार असल्याची शक्यता हवामाना खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढचे काही दिवस हवामान खात्याकडून राज्याला ऑरेंज आणि यलो
अलर्ट देण्यात आला आहे. अशात उन्हाचा तडाखाही वाढेल असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.हवामान विभागाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील ४ दिवस कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात
पावसाचं वातावरण असेल तर राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली
तर त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.हवामान विभागाकडून धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भाला
यलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार,
राज्यामध्ये पुणे, सातारा सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असून मराठवाड्यातील लातूर आणि अमरावती या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.