Saturday, January 22, 2022

महाराष्ट्रातील मोठी बातमी: अजित पवारांचे निर्बंधाबाबत लावण्याचे संकेत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाचा धोका जास्त वाढल्याने महाविकास आघाडी सरकार आता कडक पाऊल उचलणार आहे. राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

कोरोना बाधित आणि कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध कडक करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळले नाही तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज टास्क फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यानंतर कोविड नियमाबाबत पुढेचे पाऊल उचलण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच अजित पवार यांनी कडक नियम करण्याचे संकेत दिलेत.

कोरोनाच्या केसेस वाढल्या नंतर निर्बंध हे कडक करावेच लागतील. संसर्ग आधीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे .केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून

जारी करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. ओमायक्रोनचा समूह संसर्ग सुरू झालाय, अशी चर्चा आहे. मात्र त्याबद्दल ठोस माहिती नाही. या विषयात तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

राजकीय नेत्यांनीही कोविड नियमांचं पालन करणे गरजेचे, असे अजित पवार म्हणाले. तसेच जोपर्यंत कोरोनाचे संकट दूर होत नाही तोपर्यंत महापालिका निवडणूक न घेण्याचा निर्णय सर्व पक्षांनी एकमताने घेतला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!