Saturday, January 22, 2022

खासदार सुजय विखे संतापले म्हणाले हा तर बोगसपणा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच नव वर्षाच्या स्वागतसाठी विविध कार्यक्रम आणि समारंभाचं आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे.

अशावेळी राज्य सरकारकडून नव वर्षाच्या (New Year) स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. तसेच चौपाट्यांवर गर्दी न करण्याचं

आवाहन केलं असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर नगरचे भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलंय. लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू

हा बोगसपणा आहे, याची काही आवश्यकता नाही, असं मत सुजय विखे यांनी व्यक्त केलं आहे.लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू बोगसपणा आहे, याची आवश्यकता नाही. कुणालाही दंड करण्यात येऊ नये.

लग्न समारंभ होत राहतील आणि झालेच पाहिजेत. समारंभाजाला गर्दीची मर्यादा ठेवली तरी लोकांचं प्रेम असतं ते येत असतात. मात्र, लोकांनीही लग्नाला आल्यानंतर नियम पाळावे, मास्क घालावा. पंतप्रधान मोदीही तेच सांगत आहेत.

आपण प्रत्येकवेळी निर्बंध टाकू शकत नाही.माणसानं जगायचं कसं? असा सवाल सुजय विखे-पाटील यांनी विचारलाय.लग्न-समारंभावर उपजीविका असणारे अनेक कामगार असतात. त्यांनाही मुलंबाळं असतात.

लॉकडाऊन करण्यात आला तर त्यांना कोण खाऊ घालणार? अशावेळी स्वत:च आपली जबाबदारी ओळखून, स्वत:ला सुरक्षित ठेवून लसीकरण करुन घेणं, हाच एकमेव मार्ग बाकी आहे. कोणत्याही गोष्टीचं मी समर्थन करत नाही, असंही सुजय विखे-पाटील यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!