Friday, December 3, 2021

SBI चा 40 कोटी ग्राहकांना अलर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज टिम:इंटरनेटवर टोल फ्री नंबर शोधणे धोकादायक ठरू शकते, अशी सूचना SBI ने आपल्या ग्राहकांना दिलीय.एसबीआयने ग्राहकांसाठी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, टोल फ्री नंबर शोधणे धोकादायक ठरू शकते.

जेव्हा जेव्हा आपल्याला बँक किंवा कोणत्याही कामासाठी ग्राहक सेवा आवश्यक असेल, तेव्हा आपण थेट इंटरनेटवर टोल फ्री किंवा ग्राहक सेवा क्रमांकाचा शोध सुरू करता. इंटरनेटवर सापडलेल्या नंबरवर कॉल करून ते त्यांच्या समस्या सांगतात,

ज्यामुळे आपली समस्या आणखी वाढू शकते.‘ग्राहक सेवा क्रमांक शोधण्यासाठी कधीही सर्च इंजिनचा वापर करू नका. यासाठी क्रेडिट कार्ड प्रदात्याच्या अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत अॅप्लिकेशनवर नेहमी जा आणि तेथून नंबर मिळवा.

वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आपण ग्राहक सेवेसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करावा किंवा आपल्या क्रेडिट कार्डवर लिहिलेल्या नंबरवर फक्त कॉल करा. ‘

तसेच एसबीआय कार्ड म्हणतो, ‘ओटीपी, सीव्हीव्ही, पिन यांसारखी वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. तसेच एसबीआय कार्ड प्रतिनिधी कधीही अशी माहिती विचारत नाहीत. कोणताही टोल फ्री नंबर किंवा ग्राहक सेवा नंबर फोन नंबरसारखे नसतात.

ते नेहमीच 1800-, 1888-, 1844- इत्यादीपासून पासून सुरू होतात. ‘यात आपण इंटरनेटवर टोल फ्री नंबर शोधण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे आणि टोल फ्री क्रमांक माहीत नसल्यास अधिकृत वेबसाईटची मदत घ्या.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!