Tuesday, January 18, 2022

ही 5 लक्षणे दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला, ती ओमायक्रॉनचीही असू शकतात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे चिंतेत वाढ झाली आहे. तसेच देशात पुन्हा कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट चिंता वाढवणारा असल्याचे आधीच वर्ल्ड हेल्थ

ऑर्गनायझेशनने म्हटले होते आणि सद्य परिस्थिती पाहात अगदी तसेच होत आहे. कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या लक्षणांबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. इतके नाही तर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

विविध संस्थांनी कोरोना संसर्ग वाढीच्या दराबाबत देखील सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत शास्त्रज्ञ म्हणतात, की कोरोनाच्या या प्रकाराचा थेट रोगप्रतिकारक शक्तीवर खूप परिणाम होत आहे. त्यामुळे ज्यांनी

कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहे त्यांनी देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, असे आवाहन देखील केले जात आहे.

ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांना घसा खवखवण्याऐवजी घसा खाजवल्यासारखे वाटते. या दोन्ही परिस्थिती काही प्रमाणात सारख्या असू शकतात. घसा खाजवण्याची समस्या अधिक वेदनादायक असते, असे दक्षिण आफ्रिकेतील डॉ. अँजेलिक कोएत्झी यांचे मत आहे. हे लक्षण दिसून आल्यास त्वरीत जवळच्या डॉक्टरकडे जावे.

कोरोनाच्या पूर्वीच्या प्रकारांप्रमाणे ओमायक्रॉनमुळे थकवा किंवा अतिथकवा जाणवतो. एखाद्या व्यक्तीला थकल्यासारखे वाटू शकते. अंगात काही ताकद उरली नाही, असाही त्याला अनुभव येतो. सारखी झोप येत. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये व्यत्यय येऊ शकतो.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की थकवा इतर कारणांमुळे आणि आरोग्य समस्यांमुळे देखील उद्भवू शकतो.रात्रीचा घाम येणे ही देखील ओमिक्रॉनचे लक्षणे असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. अँबेन पिल्ले यांनी मांडले आहे.

रुग्णाला रात्री अचानक खूप घाम फुटतो. आश्‍चर्याची बाब म्हणजे रुग्ण एसीमध्ये झोपला तरी त्याला घाम येतो.सौम्य ते मध्यम ताप हे कोरोना व्हायरसचे प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीपासून नोंदवण्या आलेल्या लक्षणांपैकी ते एक आहे. परंतु ओमिक्रॉन

प्रकारात अंगात सौम्य ताप राहतो, अशी समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.ओमायक्रॉनचा त्रास असलेल्या रुग्णाला कोरडा खोकला देखील होऊ शकतो. कोविड 19 च्या लक्षणांमध्येही हे लक्षण दिसून आले होते. कोरडा खोकला तेव्हा होतो

जेव्हा तुमचा घसा कोरडा होतो. तुम्हाला संसर्गामुळे तुमच्या घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटते, असे लक्षण दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!