Wednesday, December 8, 2021

पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :कोरोनाने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असताना, पालकमंत्री तोंड दाखविण्यास तयार नसल्याचे आरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर करण्यात आले.

तर मुंबई, कोल्हापूरला जाणार्‍या एसटी बस, लक्झरी आणि शहरातील प्रवासी वाहनांना पालकमंत्री यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिसाचे पत्रक चिकटविण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या सुचनेनूसार नितीन भुतारे यांच्या

नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन इंपिरीयल चौकातील पुणे बस स्थानक व शहरातील प्रमुख चौकात करण्यात आले. यावेळी डॉ. संतोष साळवे, मनोज राऊत आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नितीन भुतारे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोना रुग्णांना सरकारी अथवा खाजगी दवाखान्यात उपचारासाठी बेड मिळणे अवघड झाले आहे. ऑक्सीजन व रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.

या संकटकाळात प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात योग्य नियोजन करीत आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांचे नातेवाईक सुविधा मिळत नसल्याने रस्त्यावर येत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना जिल्ह्यात येण्यास तयार नाही.

ते कधीतरी येऊन अधिकार्‍यांची बैठक घेतात, नियोजन न करता निघून जातात. उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम पालकमंत्री करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर दररोज नगरमध्ये चाळीस ते पन्नास नागरिक कोरोनाने मृत्यूमुखी पडत असताना, मुंबई व कोल्हापूरला जाणार्‍या नागरिकांनी पालकमंत्री दिसल्यास त्यांना नगरमध्ये घेऊन येण्याचे आवाहन आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!