Thursday, January 20, 2022

अत्यंत धक्कादायक:पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब भागात रॅली घेणार होते. मात्र त्यांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे या रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज फिरोजपूर

येथे मोदींच्या रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सुरक्षेत चूक घडल्यामुळे ते फिरोजपूरमधील रॅलीला जाऊ शकले नाही. काही आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला अडवलं. त्यामुळे 15 ते 20 मिनिटांपर्यंत हा ताफा फ्लायओव्हरवर अडकला होता.

पंजाब सरकारला आधीच मोदींच्या कार्यक्रमाची माहिती होती. त्यामुळे त्यांनी प्लान बी तयार ठेवणं अपेक्षित होतं, असं सांगितलं जात आहे. याशिवाय रस्ते मार्गावर पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती. ही

गंभीर चूक असल्याचं मानलं जात आहे. या प्रकरणात गृह मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली असून पंजाब सरकारकडून सविस्तर रिपोर्ट मागवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी पंजाबमधील हसैनीवाला येथून दिल्लीसाठी रवाना झाली.

फिरोजपूर व्यतिरिक्त 9 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींची उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे रॅली होणार होती. ही रॅलीदेखील रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती सांगितली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेचा भंग करण्यात आला.

आज सकाळी पंतप्रधान भटिंडा येथे उतरले तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते. पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे, पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे 20 मिनिटे वाट पाहिली.

जेव्हा हवामान सुधारले नाही, तेव्हा असे ठरले की तो रस्त्याने राष्ट्रीय मेरीटर्स मेमोरियलला भेट देईल, ज्यासाठी 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागेल. डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यास निघाले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!