नेवासा
नेवासा तालुक्यातील गेवराई जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कैलास धानापुणे यांच्या सेवापुर्ती गौरव कार्यक्रमात काळे महाराज बोलत होते. गेवराईच्या सरपंच सौ.सुनंदा कर्डीले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या.
प्रारंभी चांगदेव महाराज काळे यांचे हस्ते श्री.कैलास धानापुणे व सौ.मनीषा धानापुणे या अभयंतांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षक नेते बापूसाहेब तांबे म्हणाले, हा सेवापूर्तीचा नव्हे तर जीवनाच्या नवीन आवृत्तीचा क्षण आहे. धानापुणे हे शाळेला शिस्त लावणारा शिक्षक आहेत. आम्हाला सेवानिवृत्तीचा योग होतो की नाही अशी सध्याची परिस्थिती आहे.दुसरीकडे शिक्षणासाठी पाठवीण्याची ऐपत नसलेल्या
ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी प्राथमिक शिक्षक घेत आहेत. मात्र सरकारचे धोरण बघता कोणत्या न कोणत्या बाजूने शिक्षकाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. इतर शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेतील मुलगाच सर्वगुण संपन्न असतो असा दावा ही श्री.तांबे यांनी केला.
गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड म्हणाले, बदली,पदोन्नती व सेवापुर्ती या तिनही वेळेस निरोप समारंभ होत असतो. परंतु सेवापूर्तीचा निरोप समारंभ हा भावनात्मक प्रसंग असतो. धानापुणे गुरुजी हे प्रशासकीय कामात परिपूर्ण, शिस्तप्रिय आणि समन्वय ठेवून काम करणारे शिक्षक आहेत.
सत्काराला उत्तर देताना कैलास धानापुणे म्हणाले,माझी आई व गुरुजनांमुळे मी घडलो.१९८४ साली मी शिक्षण सेवेत आलो.विद्या ज्ञान हेच सर्वश्रेठ दान मानून काम केले.
शिक्षणाने माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलते अशा क्षेत्रात मला ३३ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे.१३ वर्षाचे कालावधीत गेवराई ग्रामस्थ व सहकारी शिक्षकांचे अमोल सहकार्य लाभले,विद्यार्थ्यांशी अतूट नाते निर्माण झाले.सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
सरपंच सौ.सुनंदा कर्डीले,शिक्षिका सौ.मनीषा धानापुणे,अशोकराव मिसाळ, श्री.कर्डिले सर,मुख्याध्यापक गणेश शेलार, वैभव नवले, शिक्षक श्री.मंडलीक, विनायक पंडित,शिक्षिका श्रीमती सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
गेवराई ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व सोसायटीचे सदस्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
शिक्षक बँकचे संचालक रामेश्वर चोपडे यांनी प्रस्ताविक व स्वागत केले.अशोक पंडित व बापूसाहेब सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश राऊत यांनी आभार मानले.