Friday, January 21, 2022

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे महाराष्ट्रातील जनतेला अत्यंत महत्त्वाचे आवाहन….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आपण हळूहळू करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सर्वाधिक रुग्णसंख्येकडे चाललो आहोत. त्यामुळे राज्यात सर्वांनाच अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले,की राज्य सरकारने करोना प्रतिबंधासाठी काही निर्बंध घातलेले असून पुढील काळात निर्बंधांचे पालन होत नसताना दिसले तर अंमलबजावणी यंत्रणेस अधिक कारवाई करावी लागेल.

कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन झाले नाही तर गुन्हे दाखल करावे लागतील.रुग्णसंख्या वाढताना दिसत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

तज्ज्ञांशी चर्चा करून आणि ओमायक्रॉनचे जगभरातील अनुभव पाहून शासन निर्णय घेत असते. राज्यात रुग्ण संख्या वाढलेली असली तरी रुग्णालयांतील संख्या तसेच प्राणवायू वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले नाही. आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र

शासन यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अत्यावश्यक नसलेल्या सेवांवर रात्री ११ ते पाच दरम्यान निर्बंध घालण्याचा प्रस्ताव असला तरी त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. रुग्णवाढीवर प्रतिबंध येण्यात अडचणी आल्या तर भविष्यात

अत्यावश्यक नसलेल्या काही सेवांवर भविष्यात बंधने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु याबाबतचा निर्णय रुग्णवाढीच्या प्रमाणावर अवलंबून असेल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!