Monday, January 17, 2022

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांना लवकरच जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली होती. केंद्र

सरकार आता कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विचार केला आहे. त्यानुसार केंद्राने यासाठी जुनी पेन्शन योजनेवर कायदा मंत्रालयाचे मतही मागवले आहे. आता मंत्रालयाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

वास्तविक, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेवर विचार करत आहे. 31 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी ज्या सरकारी नोकरभरतीच्या जाहिराती दिल्या होत्या, त्यांना हा लाभ मिळेल. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन

मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कायदा मंत्रालयाच्या प्रतिसादानंतर या विषयावर निर्णय घेतला जाईल.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी संसदेत सांगितले की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने हे प्रकरण कायदा मंत्रालयाच्या अखत्यारीत ठेवले होते. वित्तीय सेवा विभाग, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग

अशा कर्मचाऱ्यांना NPS च्या कक्षेतून वगळण्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकेल ज्यांच्या भरतीसाठी 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यापूर्वी जाहिरात जारी करण्यात आली होती आणि ते यासाठी पात्र असतील. जुनी पेन्शन योजना हे प्रकरण सुटले तर पेन्शनमध्ये मोठा फायदा होऊ शकतो.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत सांगितले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. ते म्हणाले की केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1972 अंतर्गत निमलष्करी कर्मचार्‍यांना पेन्शन आणि इतर लाभ मिळतात.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!