नेवासा
राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी अपात्र असतानाही परीक्षेला बसू देण्याची परवानगी मागणाऱ्या ४१ जणांना उच्च न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड थोटावला आहे. ४ आठवड्यांत दंडाची रक्कम
न भरल्यास याचिकाकर्त्यांच्या वेतनातून ती वसूल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यासाठी ५० कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल बनविणेसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी प्राप्त झालेल्या एकूण
४४८ अर्जापैकी इंदलकर समितीच्या आकृतिबंधामध्ये पद बसत नसल्याचे कारण देत १९० उमेदवार अपात्र ठरविण्यात आले होते.परंतु जाहिराती मध्ये कोठे ही इंदलकर समितीने सुचविलेल्या आकृतीबंधानुसार उमेदराने अर्जात नमूद केलेले पद विभागप्रमुख, खातेप्रमुख नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल असे म्हंटलेले नाही.त्यामुळे अर्ज अपात्र ठरत नाहीत अशी भूमिका घेऊन अपात्र उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद व कोल्हापुर खंड पीठात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. यातील मुंबई उच्च न्यायालयतील याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा मिळून त्यांना ५ एप्रिल रोजी झालेल्या पूर्व परिक्षेस बसन्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र अंतिम सुनवणित या
याचिकाकर्ते या परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. परंतु
न्यायालयाची फसवणूक करून त्यांनी परीक्षेला बसण्यासाठी अंतरिम परवानगी मिळवली, असे निरीक्षण न्यायमूर्ती के. आर. श्रीराम आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने नोंदवून याचिकाकर्त्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचा दंड सुनावताना नोंदवले. तसेच त्यांच्या याचिकाही फेटाळून लावल्या.
राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची पदे भरण्यासाठी साखर आयुक्तांतर्फे नुकतीच होती. परीक्षा घेण्यात आली. मात्र पदासाठी अपात्र ठरवण्यात आल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तसेच परीक्षेला बसू देण्याचे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी केली होती. एकूण ४५ जणांनी याचिका करून ते विविध विभागांचे प्रमुख होते आणि म्हणून परीक्षेला बसण्यास पात्र असल्याचे घोषित करण्यात वकिलांनी यावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्यापैकी दोघांनी याचिका मागे घेतल्या होत्या, तर इतर दोघांची पात्रता पडताळली जात होती. विशेष म्हणजे, परीक्षा ५ एप्रिल साखर रोजी होणार होती आणि न्यायमूर्ती श्रीराम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ ३ एप्रिल रोजी सुनावणीसाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी पर्यायी खंडपीठाकडे याचिका सादर केली. तसेच याचिकांवर निर्णय होईपर्यंत अंतरिम दिलासा म्हणून परीक्षेला बसण्याची परवानगी मिळवली, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचीही न्यायालयाने गंभीर दखल घेतली. त्याचप्रमाणे परीक्षेसाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता लक्षात घेता ती पूर्ण न करणारेही कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक होऊ शकतात हे गंभीर असल्याची टिप्प्णी न्यायालयाने केली आहे.