Tuesday, January 18, 2022

नगर ब्रेकिंग:ट्रकची दुचाकीला समोरून धडक, एक जण ठार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ट्रक चालकाने महामार्गावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर- सोलापूर महामार्गावर रूईछत्तीशी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला .

या अपघातात योगेश मच्छिंद्र मुरूमकर (वय 30 रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) या तरूण ठार झाला.याप्रकरणी अंबादास अंकुश मुरूमकर (वय 24 रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश मुरूमकर हे मंगळवारी सकाळी सहा वाजता त्यांच्या दुचाकीवरून बनपिंप्री (ता. श्रीगोंदे) येथून अहमदनगरच्या दिशेने येत होते. याचवेळी अहमदनगरकडून सोलापूरकडे जाणार्‍या ट्रक चालकाने महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात रूईछत्तीशी

गावातील जानईवस्तीजवळ दुचाकीला समोरून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार योगेश मुरूमकर हे ठार झाले. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. या अपघाताचीमाहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील वाहने ताब्यात घेतली आहे.याबाबत अंबादास मुरूमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बी. एम. गांगर्डे करीत आहेत.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!