Thursday, October 5, 2023

नेवासा पोलिसांची कामगिरी; चिंचबन शिवारात वाळूचा ट्रक पकडला

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील चिंचबन शिवारात प्रवारा नदीपात्रात अवैध रित्या वाळू गौनखनीज वहातुक करणारा एक ट्रक नेवासा पोलिसांनी पकडला आहे.

या बाबद पोकॉ बाळु सुभाष खेडकर (वय 31 वर्षे) धंदा-नोकरी ने नेवासा पोलीस स्टेशन यांनी नेवासा पोलीस स्टेशनला सरकारतर्फ फिर्यादित म्हंटले आहे की, दि. 22/04/2023 रोजी रात्री 03:30 वाजेच्या सुमारास सपोनि ज्ञानेश्वर थोरात व मी असे सरकारी वाहणाने चापोकॉ दिलीप रामा कुराडे असे आम्ही पोलीस स्टेशन हददीत विभागीय गस्त करत आसताना आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज मंदीराच्या पाठीमागे चिंचबन शिवारात प्रवारा नदी पाञात वाळुची अवैध सुरू आहे काय अशी खात्री करण्यासाठी गेलो असता प्रवारा नदीपत्रात जवळ नदीच्या दक्षीण बाजुला एक ट्रक डंपर आढळुन आला आहे. सदर ट्रक मध्ये एक ब्रास वाळु आढळुन आली आहे सदर वाळु ही अवैधरीत्या भरताना तसेच चोरटया पध्दतीने वाहतुक करण्याच्या उदेशाने सरद ट्रक हा प्रवरा नदीपात्रात मिळुन आला. ट्रकचा चालक घटना ठीकाणी ट्रक सोडुन पळुन गेला. तसेच सदर ट्रक हा कोणाच्या मालकीचा आहे याबाबद अदयाप खात्री झाली नाही. प्रवरा नदी पात्रात वाळुचा लीलाव झाला नाही. तसेच सदर ट्रक हा अवैधरीत्या वाळु वाहतुक करताना आढळुन आला आहे ट्रकचे व मुदेमालाचे वर्णन पुढील प्रमाणे…

१) किमत 5 लाख रुपये एक टाटा कंपनीचा ट्रक आर टी पासिंग एमएच 48 जे 7455 समोरुन पांढ-या रंगाचा बोनट व ट्रॉलीला लालसर रंग आहे.
२) किमत 5 हजार रु एक ब्रास वाळु एकुन 5 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल.सदर ट्रक वाळू सहीत नेवासा पो स्टेशन येथे आणुन लावला आहे.
सदर फिर्यादिवरुन ट्रकचा अज्ञात ड्रायवर व मालक याच्याविरद्ध भारतीय दंड सहीता कलम 379 सह गौणखनीज अधीनीयम कलम 315 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( बातमीतील डंपरचा फोटो काल्पनिक आहे)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!