Friday, December 3, 2021

नाही तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल उपमुख्यमंत्री

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना सहकार्य करत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. लोकांनी सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव मागच्यावेळी लावला तसा कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा सज्जड दमही त्यांनी दिलाय.

पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. ते पुण्यात कोरोनाच्या जिल्हा प्रशासनासोबतच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.

दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा कोरोना बाधितांची संख्या वाढलीय. त्यामुळे कठोर वाटतील असे निर्णय घेण्याची वेळ आली. म्हणूनच नागरिकांना सहकार्याची भूमिका घ्यावी. गुरुवारी (15 एप्रिल) माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही सांगितलंय

की दोन दिवसांचा लॉकडाऊन पाळला नाही तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन आणावा लागेल, तशी वेळ येऊ नये अशी विनंती आहे.”

कुंभमेळा, निवडणुका यामुळे देशभरातच कोरोना वाढताना दिसतोय. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. कर्नाटक, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. अनेक वरिष्ठांना कोरोना झालाय.

यावेळचा कोरोना आजूबाजूच्या लोकांना लवकर बाधित करतोय. त्यामुळे कुटुंबंच्या कुटुंब बाधित होत आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!