Tuesday, January 18, 2022

आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे मोठं विधान:महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन होणार नाहीच

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यात 1 ते 15 जानेवारीपर्यंत सव्वाचार लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, या काळात अडीच लाख सक्रिय रुग्ण वाढले आहेत. त्यातील जवळपास 85 टक्‍के रुग्ण घरीच उपचार घेत असून रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी

सद्य:स्थतीत केवळ दीडशे मेट्रिक टनापर्यंतच ऑक्‍सिजन लागत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन होणारच नाही, सर्वांनी लॉकडाउनचा विषय डोक्‍यातून काढून टाकावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात 2 डिसेंबरपासून 14 जानेवारीपर्यंत ओमिक्रॉनचे एक हजार 367 रुग्ण आढळले आहेत. त्यातील जवळपास आठशे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दुसरीकडे राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी सद्यस्थितीत मुंबई , रायगड , नाशिक , नगर, पुणे , सातारा ,

औरंगाबाद , नागपूर या जिल्ह्यांमध्येच रुग्णवाढ मोठी आहे. सोलापूर , कोल्हापूर, सांगली , बीड , लातूर या जिल्ह्यांमध्येही आता रुग्ण वाढू लागले असून ग्रामीणच्या तुलनेत शहरात रुग्णवाढ अधिक आहे. तरीही, प्रतिबंधित लसीकरणामुळे बहुतेक रुग्णांमध्ये

तीव्र स्वरूपाची लक्षणे नाहीत. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक किंवा दोन डोस घेतलेलेच सर्वाधिक आहेत. त्यांना ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर्सची गरज भासलेली नाही. सध्या राज्यातील अडीच लाख सक्रिय रुग्णांपैकी जवळपास 13 टक्‍के रुग्णांनाच ऑक्‍सिजन,

व्हेंटिलेटर्स लागल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. या पार्श्‍वभूमीवर 31 जानेवारीपर्यंत 15 वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण होईल, असा कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या ओहत.

त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन होणार नाही, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. सध्या जे निर्बंध लागू केलेत, त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, गर्दी होईल असे कृत्य कोणीही करू नये, नियमांचे तंतोतंत पालन करावे, प्रतिबंधित लस घेऊन सर्वांनी सुरक्षित व्हावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!