Friday, January 21, 2022

तर कठोर निर्णय घेणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठं विधान 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या ही 40 हजारांच्या घरात असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात आता आणखी कठोर

निर्बंध लागू करण्याची आवश्यकता आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याच संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी याबाबत स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात आणखी कठोर निर्बंध लागू होणार का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री

अजित पवार यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, राज्याच्या संदर्भातील निर्णय हे राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री घेतात. त्याची नियमावली मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकजण घरच्या घरीच राहून उपचार घेत आहेत.

त्या संदर्भात केंद्र आणि राज्याचं आरोग्य विभाग सातत्याने माहिती सुद्धा घेत आहेत. हे सर्व सुरू असताना जर उद्या ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि 700 मेट्रिक टनहून अधिक ऑक्सिजनची मागणी राज्यात आली

तर मग त्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदय कठोर निर्बंध घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले राज्याच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेत्रृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे.

आम्ही सर्वजण त्यांच्या टीमचे सहकार्य या नात्याने काम करत आहोत. अधिकारीही काम करत आहेत. टास्क फोर्सही सातत्याने लक्ष देऊन आहे. मुख्यमंत्री तर दररोज कोरोनाच्या स्थिती संदर्भातला आढावा घेत आहेत.कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी

आता राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, मॉल आणि थिएटर रात्री 10 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. हे निर्बंध आणि नियम 10 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!