Friday, January 21, 2022

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर होतंच. पण प्रश्न अनेकींच्या आर्थिक स्थितीचाही असतो, त्याकाळात

पॅड्सवर खर्च करावे इतके पैसे खर्च करणंही गावखेड्यातच काय शहरातही अनेकींना शक्य नसतं. आता गेल्या काही काळात सतत जनजागृती करण्यात आली की पॅड्स वापरा, त्यावरच्या सिनेमा-जाहिरातीही आल्या. पॅड्स वापरणं तुलनेनं सुखकर

असलं तरी पुन्हा एक प्रश्न होताच की, त्या पॅड्सची विल्हेवाट कशी लावायची? पॅड्स टाकायला जागा नाही म्हणून अनेकजणी ते घरात फ्लश करु लागल्या, कुणी सर्रास कचऱ्यात फेकू लागल्या जे सफाई मदतनिसांसाठी भयंकर घातक.

गावखेड्यात तर असे पॅड्स उघड्यावर फेकले तर ते जनावरांच्या पोटात जाण्याचेही भय आहेत. शहरात तरी पॅड्स कागदात गुंडाळून, पॅक करुन घंटागाडी येते त्यात टाकले जातात पण खेड्यात काय? तिथं महिलांना पॅड्स परवडणं अवघड,

ते ही घेतलेच तर त्यांची विल्हेवाट हा मोठा प्रश्न. अशा सगळ्या प्रश्नांच्या आणि महिलांच्याआरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर केरळच्या एक गावानं सरळ तोडगा शोधला. आणि हे गाव ‘सॅनिटरी नॅपकिन फ्री’ गाव झालं. म्हणजे आता

या गावात राहत असलेली कोणतीही महिला त्या चार दिवसात सॅनिटरी नॅपकिन वापरत नाही.केरळचे राज्यपाल अरीफ खान मोहंमद यांनी १३ तारखेला घोषणा केली की कुंबलांगी हे एरनाकुलम जिल्ह्यातलं गाव देशातलं पहिलं सॅनिटरी नॅपकिन फ्री गाव आहे.

खरंतर एका निवडणूक मोहीतून ही योजना आकाराला आली. येथील खासदार हिबी इडेन यांनी ‘अवलकाई’ ही योजना अमलात आणली. महिलांसाठीचा उप्रक असा त्याचा अर्थ. ही योजना त्यांनी त्यांच्या एरनाकुलम मतदारसंघात राबवली. वय वर्षे १८ पासून पुढच्या महिलांना

सरासरी ५००० मेन्स्ट्रुअल कपचे वाटप करण्यात आले. त्यासाठी त्यांनी एचएलएल आणि इंडियन ऑइल कार्पोरेशनची मदत घेतली.मेन्स्ट्रुअल कप कसे वापरायचे याचे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. समजावूनही सांगण्यात आले

की सॅनिटरी नॅपकिन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आहे त्याचे विघटन व्हायला पाचशे वर्षांहून अधिक काळ लागतो.त्यानंतर या गावातील महिलांनी हे कप वापरण्यास सुरुवात केली आता आता हे गाव सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव म्हणून घोषित करतण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!