Tuesday, May 17, 2022

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला कोरोनाची

लागण झाल्यास काय काळजी घ्यावी? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.जर तुमच्या घरात कोणी कोरोबाधित रुग्ण असेल, तर त्याच्याशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी.

कोरोनाबाधित व्यक्तीशी सातत्याने संपर्क आल्यास तुम्हाला देखील कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तुम्ही घरातील अशा व्यक्तीची निवड करा की तिची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल.

त्याच व्यक्तीचा फक्त घरातील कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्क यावा. घरातील जे वृद्ध व्यक्ती आहेत, किंवा ज्या लोकांना विविध आजार आहेत अशा व्यक्तीला शक्यतो कोरोनाबाधित व्यक्तीपासून दूरच ठेवा, कारण अशा व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो.

कोरोनावरचे सर्वात प्रभावी साधन आहे. म्हणून घरातून बाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. जर तुमच्या घरात एखादा कोरोनाबाधित रुग्ण असेल तर तुम्ही घरी देखील मास्कचा वापर करा.

यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसून, कोरोनापासून तुमचे संरक्षण होईल.कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमच्या घरात कोरोनाचा रुग्ण आहे, तोपर्यंत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नका.

तसेच तुम्ही देखील शक्यतो बाहेर जाणे टाळा.तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल आणि जर ती घरीच होम क्वॉरंटाईन असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था करा.

कारण असे केल्यास तुमचा संबंधित व्यक्तीशी वारंवार संपर्क येणार नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका कमी होईल.

ताज्या बातम्या

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...
error: Content is protected !!