नेवासा
संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष अमोल अभंग यांनी केले.
तालुक्यातील कुकाणा येथे संत भगवान बाबा सार्वजनिक पुण्यतिथी सोहळा समिती आयोजित कार्येक्रमात युवा नेते अभंग बोलत होते. प्रारंभी अभंग यांचे हस्ते संत भगवान बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र बागडे, राहुल जावळे, सुभाष चौधरी, समीर पठाण, जवाहर भंडारी, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुका उपाध्यक्ष युनूस नालबंद, जावेद शेख, अक्षय कचरे, सचिन साबळे, गुरुदीप बत्रा उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. सुनील गर्जे यांनी केले.
तालुक्यातील तरवडी येथे सरपंच बाबासाहेब घुले, मेजर नवनाथ घुले रावसाहेब घुले, रामदास घुले, देविदास घुले, वंजारवाडी येथे कैलास डोळे, जैनपुर येथे राजेंद्र नागरे, दत्तात्रेय नागरे, राजेगाव येथे संदीप शिरसाठ, माका येथे संपत घुले, भानसहिवरे येथे राजेंद्र कीर्तने, घोडेगाव येथे संदीप चेमटे यांच्या हस्ते बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान, संत भगवान बाबा यांची नेवासा तालुक्यात घोडेगाव, सोनई, वंजारवाडी, हनुमानवाडी, विठ्ठलवाडी, गणेशवाडी, निंभारी, मोरयाचिंचोरे, मांडे मोरगव्हान, महालक्ष्मी हिवरा, सुकळी, अमळनेर, भेंडा, नेवासा फाटा येथे ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली.