माय महाराष्ट्र न्यूज:विवाहित महिलेवर अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा आरोपी मनोज भालचंद्र जाधव (वय २३, रा. रेणुकानगर, बोल्हेगाव, अहमदनगर) यास तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.
विवाहित महिला व मनोज भालचंद्र जाधव यांची ओळख झाली होती.त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मनोजसोबत विवाहित महिला ऑक्टोबर २०२१ मध्ये एमआयडीसीतील एका बागेत गेली होती.
पाणी प्यायल्यानंतर तिला झोप आली. त्यानंतर तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. या गोष्टीची वाच्यता केली तर नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित महिलेने याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे तपास करीत आहेत.