Saturday, July 2, 2022

1 फेब्रुवारीपासून हे तीन नियम बदलणार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रत्येक महिन्याला कोणत्या ना कोणत्या नियमांमध्ये बदल होत असतात त्याप्रमाणे या वेळी देखील एक फेब्रुवारीपासून काही नियम बदलत आहेत. काही सेवांच्या दरांमध्ये बदल होणार आहेत

यासंबंधी माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्टेट बँकेच्या आयएमपीएस सेवेमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. तर,1 तारखेला जाहीर होणाऱ्या एलपीजी गॅसच्या किमतींवर देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प जाहीर करणार असल्याने त्या वेळी देखील होणाऱ्या बदलांचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होणार असल्याचे दिसून येते.कोणत्याही व्यक्तीने जर स्वतः बँकेत उपस्थित राहून आयएमपीएस

सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकाला एक हजार रुपयांपर्यंत शुल्क द्यावे लागणार नाही. 1 हजार रुपयांपेक्षा जास्त ते 10 हजार रुपये पर्यंतच्या व्यवहारासाठी 2 रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावी लागेल. 10 हजार रुपये 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी 4 रुपये आणि जीएसटी शुल्क,

1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत 12 रुपये शुल्क आणि जीएसटी, 2 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या सेवेसाठी 20 रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावी लागेल.भारतात कोट्यावधी लोक घरगुती गॅसचा वापर जेवण बनवण्यासाठी करतात. त्याच्या बदलणाऱ्या

किमतींवर सर्वांचे लक्ष असतं. ऑइल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती गॅस आणि व्यवसायिक गॅसचे दर जाहीर करतात. दिल्लीत सध्या विना अनुदानित घरगुती गॅस ची किंमत 899, कोलकत्ता मध्ये 926, मुंबईमध्ये 899, चेन्नई मध्ये 915 रुपये आहे.

तर, व्यवसायिक सिलेंडरची किंमत दिल्लीत 1998 रुपये, कोलकातामध्ये 2076, मुंबईमध्ये 1948 आणि चेन्नईमध्ये 2131 रुपये शुल्क द्यावं लागतं.1 फेब्रुवारी पासून स्टेट बँकेने आयएमपीएसच्या दरांमध्ये बदल केला आहे. दोन लाख रुपये पर्यंतच्या

आयएमपीएस सेवेवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून आयएमपीएसची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवल्यानंतर स्टेट बँकेने देखील त्यांच्या आयएमपीएसची मर्यादा वाढवून पाच लाख केली आहे.

एखाद्या ग्राहकानं स्टेट बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँक किंवा डिजिटल माध्यमातून पाच लाखांचा आयपीएस केलं तर त्याच्यापासून शुल्क घेतले जाणार नाही.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!