Saturday, July 2, 2022

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात बऱ्याच ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत असून ते बघता दहावी आणि बारावीच्या पूर्वनियोजित परीक्षा पुढे ढकलल्या जाणार का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत बोलताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी

15 फेब्रुवारीपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं सांगितलं आहे.राज्यातील सध्याची करोनाची परिस्थिती पाहता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात असे सांगितले होतं. याविषयी शालेय

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यमंत्र्यांशी याबाबत बैठक झाली आहे. खूप गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आज कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जातो आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेऊ. पुढे त्या

म्हणाल्या, एक गोष्ट समजून घेतली पाहिजे पुरवणी परीक्षा असते. कोरोनामुळे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकले नाहीत. त्यांना पुरवणी परीक्षेस बसवावे लागेल. अशा एकावर एक गोष्टी अवलंबून असतात. त्यानंतर अकरावीचे प्रवेश असतात. त्यामुळे कुठलाही निर्णय

घेताना तो विचारपूर्वक घेतला पाहिजे. अभ्यासक्रमाच्या संदर्भात आम्ही शैक्षणिक बोर्डासोबत चर्चा करत आहोत, असंही त्या म्हणाल्या. १५ फेब्रुवारीपर्यंत आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेतो आहे. शिक्षक संघटना, शिक्षक तज्ञ, मुख्याध्यापक

या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवून निर्णय घेतला जाईल, असे सांगत सध्यातरी वेळेवरच परीक्षा होतील आणि ऑफलाईन परीक्षा होतील, अशी शक्यता आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!